नखं सुंदर आणि आकर्षक दिसावीत यासाठी महिला नेहमीच नेलपेंटचा वापर करतात.
मात्र अनेकदा अगदी नवीन नेलपेंटही काही दिवसांत सुकायला लागते किंवा घट्ट होते. ज्यामुळे ती वापरणं कठीण होतं.
अशा वेळी ती फेकून न देता काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही नेलपेंटचा पुन्हा वापर करु शकतात.
जर नेलपेंट घट्ट किंवा अर्धवट सुकलेली असेल. तर त्यामध्ये थोडेसे नेलपॉलिश रिमूव्हर घाला. त्यानंतर बाटली नीट हलवा.
यामुळे नेलपेंट पुन्हा पातळ आणि वापरण्यास योग्य होते. पण लक्षात ठेवा, रिमूव्हरचं प्रमाण जास्त नसावं.
नेलपेंट जास्त गरम किंवा थंड ठिकाणी ठेवल्यास लवकर सुकते. त्यामुळे नेलपेंट नेहमी योग्य तापमानात आणि सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावी.
नेलपेंट कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण जास्त थंड झाल्यावरही नेलपेंट सुकू लागते.
जर रिमूव्हर नसेल तर गरम पाणी उपयोगी ठरू शकतं. एक बाऊल गरम पाण्याने भरा आणि त्यामध्ये नेलपेंटची बाटली काही मिनिटं ठेवा.
त्यानंतर बाहेर काढून नीट हलवा. यामुळे बाटलीतली नेलपेंट वितळते आणि ती पुन्हा वापरण्यायोग्य होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)