जसं प्रत्येक व्यक्तीची उंची, रंग, शरीराची ठेवणं वेगवेगळी असते तसेच त्यांच्या नखांचा आकार सुद्धा वेगवेगळा असतो.
तेव्हा नखांच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो.
चौकोनी, गोलाकार चौकोनी, गोलाकार, ओव्हल आणि बदाम अशा विविध आकाराची नखं दिसून येतात.
चौकोनी आकाराची नखं असलेल्या व्यक्ती या स्वभावाने कठोर असतात. असे व्यक्ती टीमलीडर म्हणून चांगले काम करू शकतात.
काही लोकांची नखं ही अंडाकृती आकाराची असतात. अशा व्यक्ती या अबोल असतात इतरांमध्ये मिसळणे त्यांना फार आवडत नाही. कुटुंब आणि स्वतःवर अधिक प्रेम असल्याने अशा व्यक्ती कुटुंबवत्सल असतात.
बदामी शेपच्या आकाराची नखं ही टोकाकडे निमूळती असतात. ज्यामुळे त्यांच्या नखांचा आकार बदाम सारखा दिसतो. अशा व्यक्ती दुसऱ्यांच्या मनाचा विचार स्वतःपेक्षा जास्त करतात.
नैसर्गिकपणे लांब नखं असणाऱ्या व्यक्ती या स्वभावाने प्रेमळ आणि रोमॅंटिक असतात. तसेच अशा व्यक्ती क्रिएटिव्ह असून त्यांच्याकडे काम कौशल्याने करण्याचे कसब असते.
ज्या व्यक्तींची नख कमी उंचीची आणि रुंद आकाराची असतात अशा व्यक्ती निरोगी असतात. अशा व्यक्तींचे विचार अगदी स्पष्ट असतात आणि बोलण्याची पद्धत अगदी रोखठोक असते. (Disclaimer : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)