स्फोट म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम लक्षात येतो तो सिलेंडर, एसी किंवा इतर विद्युत उपकरणे.
मात्र, तुम्हाला माहित आहे का, तुमच्या बाथरूममधील टॉयलेट कमोडही स्फोट होण्याचे कारण ठरू शकते?
हे थोडं विचित्र वाटेल, पण हे पूर्णपणे शक्य आहे आणि असे प्रकार वास्तविक आयुष्यात घडलेले आहेत.
टॉयलेटच्या पाईप किंवा ड्रेनेज सिस्टममध्ये बायोगॅस, मिथेन आणि हायड्रोजन सल्फाईडसारखे ज्वलनशील वायू जमा होतात.
हे वायू एकाच ठिकाणी साचले तर अग्निस्पर्श किंवा इतर कारणांमुळे स्फोट होण्याची शक्यता निर्माण होते. हे टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
बाथरूममध्ये गॅस लीक किंवा साचलेल्या वायूचा अंदाज घेण्यासाठी गॅस डिटेक्टरचा वापर करा.
टॉयलेटमध्ये वायू साचू नये म्हणून नेहमी योग्य व्हेंटिलेशन असावे.
ड्रेनेज सिस्टम बंद किंवा खराब झाल्यास वायू साचण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नियमित प्लंबिंग तपासणी करावी.
जास्त प्रमाणात वापरल्यास हे क्लिनर काही केमिकल रिअॅक्शन घडवून आणू शकतात, ज्यामुळे वायू तयार होण्याचा धोका वाढतो.
वापरल्या न जाणाऱ्या टॉयलेटमध्ये पाणी सुकल्यास वायू बाहेर येऊ लागतो. त्यामुळे दररोज पाणी ओतणं गरजेचं आहे.
हे प्रकार दुर्मिळ असले तरी गंभीर आहेत. त्यामुळे थोडीशी खबरदारी तुमचं घर आणि कुटुंब सुरक्षित ठेवू शकते.