तुमची लग्नाची तारीख सांगेल कसं असेल वैवाहिक जीवन

Pooja Pawar
Mar 28,2025


लग्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जाणून घ्यायचे असते की त्यांचा जीवनसाथी कसा असेल. अंक ज्योतिषशास्त्रात विवाह तिथीच्या आधारे वैवाहिक जीवनाबाबत बऱ्याच गोष्टी कळू शकतात.


अंक ज्योतिषशास्त्रात लग्नाच्या तारखेनुसार वैवाहिक जीवनाची भविष्यवाणी केली जाते. अशाप्रकारे विवाह तिथीच्या आधारे मूलांक काढला जातो. जर तुमच्या लग्नाची तारीख 14 असेल तर मूलांक अंक 1+4= 5 असा असेल. लग्नाच्या तारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. विवाहाच्या तारखेला वैवाहिक जीवनात खूप महत्त्व असते आणि त्याच्याच आधारे काढण्यात आलेल्या मूलांकाचा परिणाम वैवाहिक जीवनावर होतो.

मूलांक 1 :

मूलांक 1 : जर कोणाचं लग्न हे 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर अंक ज्योतिषशास्त्रात याचा मूलांक 1 मानला जातो. ज्यांचं लग्न या तारखांना होत त्यांचं नातं आपल्या जोडीदारासोबत विरोधी संबंध असतात. पण कालांतराने नातं मजबूत होत जातं.

मूलांक 2 :

मूलांक 2 : ज्या लोकांच्या विवाहाची तिथी 2, 11, 20 किंवा 29 अशी असते, त्यांच्या लग्नाचा मूलांक 2 असतो. या तारखेला लग्न करणाऱ्या जोडप्यांना आपल्या जोडीदाराकडून नात्यात प्रेम आणि सहकार्य मिळते.

मूलांक 3 :

मूलांक 3 : जर कोणाचं लग्न हे 3, 12, 21 किंवा 30 तारखेला होतं. त्यांच्या लग्नाचा मूलांक 3 असतो. अशा जोडप्याचं वैवाहिक जीवन हे आनंद आणि उत्साहाने भरलेलं असतं आणि दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात.

मूलांक 4 :

मूलांक 4 : ज्या लोकांच्या विवाहाची तिथी 4, 13, 22 आणि 31 असते अशा व्यक्तींचा मूलांक 4 असतो. या तारखेला लग्न करणारे व्यक्ती आपल्या जोडीदाराची प्रत्येक गोष्ट ऐकतात आणि नेहमी सुखद आणि संतुलित जीवन जगतात.

मूलांक 5 :

मूलांक 5 : जर कोणाचं लग्न हे 5, 14 आणि 23 या तारखेला झालं. तर अशा व्यक्तींचा विवाह मूलांक 5 होतो. या जोडप्यामध्ये सुरुवातीला काही खटके उडू शकतात पण वेळेनुसार त्यांचं नातं हे अधिक घट्ट आणि चांगलं होतं.

मूलांक 6 :

मूलांक 6 : ज्या लोकांच्या विवाहाची तिथी 6, 15 किंवा 24 तारखेला झालं असेल तर अशा व्यक्तींचा विवाह मूलांक 6 होतो. या तारखेला लग्न करणाऱ्या व्यक्ती एकमेकांसोबत खूप चांगला काळ घालवतात आणि त्यांच्या नात्याविषयी लोकांमध्ये चर्चा सुद्धा असते.

मूलांक 7 :

मूलांक 7 : जर कोणाचं लग्न हे 7, 16 किंवा 25 या तारखेला झालं, तर अशा लोकांचा विवाह मूलांक 7 असतो. अंकशास्त्रानुसार अशा जोडप्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी आणि आनंदी राहते.

मूलांक 8 :

मूलांक 8 : जर कोणाचं लग्न हे 8, 17 किंवा 26 या तारखेला झालं असेल तर अशा लोकांचा विवाह मूलांक 8 असतो. या तारखांना लग्न करणाऱ्या जोडप्यांना त्यांच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळते आणि प्रत्येक अडचणीत एकमेकांना साथ मिळते.

मूलांक 9 :

ज्या लोकांच्या विवाहाची तिथी 9, 18 किंवा 27 तारखेला झालं असेल तर अशा व्यक्तींचा विवाह मूलांक 9 होतो. अंकशास्त्रानुसार अशा जोडप्यांचे वैवाहिक जीवनात मतभेद राहतात पण ते त्यांचं नातं अधिक मजबूत करतात.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story