9 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. आजकाल फक्त बहिणी भावालाच नाही तर भाऊ बहिणीला आणि बहिणी बहिणीला सुद्धा राखी बांधतात.
राखीचा धागा हा अत्यंत पवित्र मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार 9 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा एक खास शुभ मुहूर्त आहे.
हा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. त्यानंतर हा शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 20 मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय दिवसभरात कधीही तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकता.
आता प्रश्न आहे राखी भावाच्या कोणत्या हातावर बांधायला हवी? तर याच उत्तर अगदी सरळ आहे.
धागा हा राखीचा असो किंवा कोणत्याही देवाचा तो पुरुषांच्या उजव्या तर स्त्रियांच्या डाव्या हाताच्या मनगटावर बांधला गेला पाहिजे.
असं यासाठी की अर्धनारीनटेश्वराची प्रतिमा तुम्ही पाहिली तर लक्षात येईल की स्त्रिया ही प्रकृतीची डावी बाजू आणि पुरुष ही उजवी बाजू आहे. हे दोघे समप्रमाणात ही सृष्टी सांभाळत आहेत, धर्मकार्यातही स्त्री पुरुषाच्या डाव्या बाजूला बसते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)