पालकांच्या 'या' सवयींमुळं मुलं रागीट व चिडचिडी होतात!

लहान वयातच मुलांना शिस्त लावली तर ते समजूतदार होतात. त्यामुळं या वयातच मुलांना योग्य संस्कार द्यावे.

प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी चांगलाच विचार करतात. मात्र, अनेकदा पालकांच्या काही सवयींमुळं मुलांबरोबरचे त्यांचे नाते खराब होऊ शकते. या पाच सवयी कोणत्या जाणून घेऊया.

आई-वडिलांकडून मुलांना गरजेपेक्षा जास्त प्रोटेक्ट करतात. त्यांना सतत रागवणे, दुसऱ्यांसोबत तुलना करणे पालकांच्या अशा वागण्यामुळं मुलं त्यांच्यापासून दूर होतात. मुलांसोबत तुमचे संबंध टिकून ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात घ्या.

गरजेपेक्षा जास्त काळजी घेण्यास मुलं चिडचिडी होतात. मुलांची सुरक्षा गरजेची आहेच पण त्यातबरोबर मुलांना बाहेरील काही गोष्टींचा अनुभवही घेऊन द्यावा. त्यांच्या विकासासाठी हे खूप गरजेचे आहे.

लहान मुलांची मते विचारात घ्या. त्यामुळं मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव होते. त्याचे मत तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे हे त्यांना जाणवते. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना याचा राग येऊ शकतो.

मुलांबाबत निर्णय घेताना त्याचा होकार घ्यायला शिका. त्यांच्या नकळत निर्णय घेऊन नका. त्यामुळं ते अधिक रागीट होऊ शकतात व त्यांचा आत्मविश्वास

तुमच्या अपेक्षा मुलांवर थोपवू नका त्यांच्यावर दबाव निर्माण करु नका. यामुळं मुलं तणाव, अस्वस्थता निर्माण होते.

VIEW ALL

Read Next Story