मूल घरात आलं, रमलं की त्याच्याशी/ तिच्याशी संवाद साधा. त्यांना नेमकं काय विचारायचं हे पाहून घ्या.
आज शाळेत तुझा दिवस कसा गेला? प्रश्न विचारून त्यावर एका शब्दात उत्तर मिवून तुम्ही कंटाळला आहात का? मग मुलांना विचारा, आज शाळेत मैदानावर खेळायचा तास घेतला का?
आज शाळेत कोणतंही काम करताना तुला काही अडचण आली का? हा प्रश्न विचारून तुम्ही मुलांच्या अडचणींवर तोडगा सुचवू शकता.
आज तुझ्या शिक्षकांनी कोणत्या विषयावर भर दिला? संपूर्ण दिवस ते काय म्हणत होते? हा प्रश्न विचारून तुम्हाला मुलाच्या शाळेत नेमकं काय शिकवलं जातंय याचा अंदाज येईल.
या एका प्रश्नाच्या उत्तरानं हशा पिकू शकतो. कारण, शाळेत असे अनेक किस्से घडतात जे मुलांना घरी सांगायचे असतात.
विज्ञान विषयापासून गणितापर्यंत विद्यार्थीदशेत असणाऱ्या तुमच्या मुलाला शालेयजीवनात दर दिवशी नवं काय, याची उत्सुकता तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरातून लक्षात येईल.
या प्रश्नामुळं कृतज्ञता, आभारभाव याबद्दल मुलं कायम सजग राहून आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी ती कायम कृतज्ञ राहतील.