अशा काही सवयी आहेत ज्यामुळे आपण आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे आपण नेहमीच दु:खी राहतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 सवयींबद्दल सांगणार आहोत.
जर तुम्ही स्वत:ची तुलना सर्वांशी करत असाल तर तुम्ही कधीही आनंदी राहू शकत नाही. तुम्ही कधीच नवीन काही करू शकत नाही.
जर तुम्ही प्रत्येक गोष्टींबद्दल जास्त विचार करत असाल तर तुम्ही कधीच स्वत:ला आनंदी ठेवू शकणार नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दु:ख असते. पण जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यासोबत नेहमीच वाईट गोष्टी घडतात तर तुम्ही दु:खी राहाल.
जो माणूस नेहमी तक्रार करत असतो. त्याच्यासोबत सर्वकाही चुकीचे होत असते. त्यामुळे तो कधीच आनंदी राहत नाही.
जर तुम्ही जुन्या गोष्टींचा विचार करत असाल आणि सध्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही आनंदी राहू शकत नाही.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)