पगार हातात पडताच करा ही 5 कामं! 50-30-20 फॉर्म्युलाने महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुरेल सॅलरी

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

चांगली सवय

बचत करणे ही एक चांगली सवय मानली जाते. त्यातही पैशाने पैसा वाढवण्याचं कौशल्य चांगलं लक्षणं मानलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

बचत करण्याची सवय नसते

प्रत्येकाला बचत करण्याची सवय नसते तसेच अनेकांना ती सवय लावताही येत नाही.

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

वायफळ खर्च

खर्चिक स्वभाव असल्याने अनेकदा असे लोक आपल्या पगारातील बराचसा पैसा कुठेही गुंतवणूक न करता खर्च करुन टाकतात. अनेकदा हा वायफळ खर्च असतो.

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

पैसे जपून वापरण्याची गरज

यामुळेच महिन्याच्या शेवटी आर्थिक चणचण निर्माण होते. म्हणूनच पैसे जपून वापरण्याची गरज आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

तीन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवल्या पाहिजे

महिन्याच्या शेवटी तुमचा खिसाही रिकामा राहत असेल तर तीन गोष्टी तुम्ही पक्क्या लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

तीन गोष्टी कराच

या तीन गोष्टी केल्याने तुम्ही तुमच्या पगारात महिन्याचा खर्च सहज भागवू शकता आणि काही पैसे बचत म्हणून बाजूलाही काढू शकता.

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

50-30-20 हा फॉर्म्युला वापरा

तुम्ही तुमचा पगार महिनाभर पुरावा यासाठी 50-30-20 हा फॉर्म्युला वापरु शकता.

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

कसा आहे हा फॉर्म्युला?

50 टक्के गरजा, 30 टक्के लाइफस्टाइल, 20 बचत असा हा फॉर्म्युला असावा.

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

बजेट निश्चित करा

पगार येताच महिन्याच्या खर्चाचं एक बजेट निश्चित करा आणि ते काटेकोरपणे पाळलं जाईल याची काळजी घ्या.

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

ऑनलाइन शॉपिंगला मुरड घाला

वायफळ खर्च टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग आणि बाहेर खाण्याच्या इच्छांना थोडी मुरड घालणं उत्तम निर्णय ठरु शकतो.

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

पैसे दुसऱ्या खात्यावर वळवा

आपल्या पगारातील काही पैसे दुसऱ्या खात्यावर वळवा जे युपीआयशी संलग्न नसेल.

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

पैसे बाजूला काढून ठेवा म्हणजे...

आपल्या पगारातून काही पैसे बाजूला काढून आपत्कालीन निधी साठवण्यास सुरुवात करा. असं केलं तर तुम्हाला कोणाकडून पैसे उधार घेण्याची वेळ येणार नाही. (प्रातिनिधिक फोटो)

Published by: Swapnil Ghangale | Oct 29, 2025

VIEW ALL

Read Next Story