आश्चर्याची बाब माहितीये का?

आश्चर्याची बाब माहितीये का? तुम्ही हाताची मूठ कशी बांधता यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सहज अंदाज लावता येऊ शकतो.

संवेदनशील व्यक्ती

माईंड जनरलमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार जर मूठ धरताना तुम्ही अंगठा बाहेर ठेवताय तर तुम्ही अतिशय संवेदनशील, कल्पक आणि इतरांची मदत करणाऱ्यांपैकी आहात.

अंगठा बाहेर ठेवून मूठ

हाताचा अंगठा बाहेर ठेवून मूठ बांधणारी मंडळी सहसा दयाळू, उत्साही आणि लहानसहान गोष्टींची तमा न बाळगणाऱ्यांपैकी असतात. ही माणसं जिज्ञासू आणि धाडसी असतात.

अंगठा सर्व बोटांच्या वर

मूळ बांधताना तुमचा अंगठा सर्व बोटांच्या वर येतोय तर तुम्ही एक प्रतिभावंत व्यक्तीमत्त्वं आहात. तुमचे विचार इतरांना पटण्याजोगे असून, तुम्ही मनमिळाऊ स्वभावाचे आहात.

आत्मविश्वासू

चित्रात दिसतेय तशी मूठ असणारी मंडळी उदार, आत्मसन्मान बाळगणारी, आत्मविश्वासू, आदर्शवादी असतात.

भावनिक व्यक्ती

अंगठा आत ठेवून मूठ बांधणारी मंडळी विनोदी स्वभावाची आणि भावनिक असतात. एखाद्या प्रसंगी ही माणसं क्षणात व्यक्त होतात.

अंगठा आत असणारी मूठ

अंगठा आत असणारी मूठ बांधण्याची सवय असणारे सहसा कलेकडे कल असणारे असतात. दांडगी वैचारिक क्षमता, मनमिळाऊ स्वभावाचे असतात.

VIEW ALL

Read Next Story