मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. अशात जर तुमचा मोबाईल पावसात भिजला असे तर काही उपायांनी तो ठीक होईल.
फोन ताबडतोब बंद करा. भिजलेला फोन सुरु ठेवणे धोकादायक ठरू शकते.
फोनमधून सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढा. यामुळे आणि डेटा सुरक्षित राहील.
बाहेरून फोन साफ व कोरडा करण्यासाठी मऊ सूती कपड्याचा वापर करा.
फोन एका हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक बॅगेत टाका आणि त्यात कच्चा तांदूळ भरा.
24 ते 48 तास तसेच ठेवून द्या. तांदूळ ओलावा शोषून घेतो.
हेट गन किंवा हाय टेंपरेचर ड्रायर वापरू नका. त्यामुळे नुकसान होऊ शकते.