चोरून आणलेलं मनीप्लांट घरात लावणं शुभ की अशुभ?

Published by: Zee Team | May 18, 2025

वास्तूशास्त्रानुसार घरात किंवा ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी मनीप्लांट लावणं शुभ मानलं जातं. मनी प्लांटमुळे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते, असं म्हटलं जातं.

Published by: Zee Team | May 18, 2025

काहीजण मनी प्लांट विकत घेऊन नाही तर चोरीकरून आपल्या घरी लावतात. यामुळे खरंच फायदा होतो आणि आर्थिक स्थिती सुधारते असं त्यांचं म्हणणं असतं. मात्र चोरून आणलेलं मनीप्लांट घरात लावणं शुभ आहे की अशुभ याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | May 18, 2025

परंतु तज्ज्ञांच्या मते मनी प्लांट चोरी करणे योग्य नसून यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे मनी प्लांट चोरण्याची चूक करू नये, अन्यथा फायद्या ऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

Published by: Zee Team | May 18, 2025

मनी प्लांट चोरण्याप्रमाणेच ते कोणालाही दान करू नये. असं केल्याने शुक्र ग्रह क्रोधीत होतो आणि आर्थिक संकट येतात असं तज्ञ सांगतात.

Published by: Zee Team | May 18, 2025

मनी प्लांट हे वास्तूशास्त्रानुसार घरात किंवा ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी लावणं शुभ असतं त्यामुळे मणी प्लांट नेहमी स्वतःच्या पैशांनी खरेदी करावे आणि लावावे.

Published by: Zee Team | May 18, 2025

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही सुकू देऊ नये.यामुळे नकारात्मकता येते. मनी प्लांट घराच्या आतमध्ये ठेऊ शकता, तसेच त्याला नियमित पाणी घालत राहा.

Published by: Zee Team | May 18, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तूशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Zee Team | May 18, 2025

VIEW ALL

Read Next Story