भोपळा कोणी खाऊ नये? लक्ष द्या, नाहीतर महागात पडेल

Sayali Patil
Jun 02,2025

भोपळा

भोपळा आरोग्यासाठी कितीही गुणकारी असला तरीही काही मंडळींना मात्र त्याच्या सेवनातून फायदा होत नाही.

मधुमेह

भोपळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असल्या कारणानं मधुमेह असणाऱ्यांच्या शरीरार रक्तातील साखरेचं प्रमाण त्याच्या सेवनानं वाढू शकतं.

पचनक्रिया

पचनक्रिया कमकुवत असणाऱ्यांनी भोपळा खाऊ नये. अती प्रमाणात भोपळा खाल्ल्यानं अपचन, ब्लोटिंग, गॅस अशा समस्या सतावतात.

अॅलर्जी

काहींना भोपळ्याच्या सेवनामुळं त्वचेची अॅलर्जी, शरीराला सूज, श्वसनास त्रास अशाही समस्या भेडसावतात.

रक्तातील साखरेचं प्रमाण

काही प्रकरणांमध्ये भोपळ्याच्या सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होऊन त्यामुळं अशक्तपणा किंवा चक्कर येऊ शकते.

प्रकृती

गर्भवती महिला किंवा प्रसूत मातांनी भोपळ्याचं सेवन टाळावं. आरोग्य, प्रकृती स्थिर असणाऱ्यांसाठी मात्र भोपळ्याचं सेवन फायद्याचं ठरतं.

अती प्रमाणात सेवन टाळा

थोडक्यात अती प्रमाणात सेवन करण्यापेक्षा नियमित आहारात काही दिवसांच्या अंतरानं भोपळा खाल्ल्यास शक्यतो त्यामुळं त्रास होत नाही. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून आहारविषयक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story