काश्मिरी मुलींच्या सुंदरतेची चर्चा नेहमीच होत असते. आजकालच्या तरुणींना काश्मिरी मुलींच्या सौंदर्याचे नेहमीच आकर्षण वाटत असते.
काश्मिरी मुलींच्या सौंदर्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जेनेटिक्स कंडीशन्स.
यासोबतच काश्मीरचे वातावरणसुद्धा तिथल्या मुलींच्या सुंदरतेचं प्रमुख कारण मानलं जातं.
काश्मीरमधील हवामान थंड असल्याकारणाने काश्मीरमधील मुली अधिक सुंदर असतात.
याच कारणामुळे काश्मिरी मुलींचे डोळेदेखील अधिक सुंदर आणि आकर्षक असतात.
याशिवाय, काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करत काश्मीरी मुली स्वत:ला निरोगी आणि सुदृढ ठेवत असतात.
काश्मीरमध्ये सुंदरतेला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक नैसर्गिक गोष्टी सहजरित्या प्राप्त होत असतात. याच गोष्टींचा वापर करत असल्यामुळे काश्मिरी मुली अधिक आकर्षक दिसतात.
काश्मिरी मुली नेहमी आपल्या आहारात अक्रोड, बदाम, हिरव्या भाज्या आणि दूधापासून बनलेल्या पदार्थांचा समावेश करतात.
काश्मिरी मुलींचा साधा आणि सकस आहारदेखील त्यांच्या सुंदरतेचं रहस्य असल्याचं सांगितलं जातं.