'या'साठी लिफ्टमध्ये लावले जातात आरसे

आजकाल लिफ्टचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतोय. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर चढून जायचे म्हटलं तरी दम लागतो.मग 10,15 किंवा 20 मजल्यापर्यंत कसे जाणार यासाठी लिफ्टचा शोध लावण्यात आला.

बहुकेदा लिफ्टमध्ये आपल्याला आरसा पहायला मिळतो. आजकाल आरशांसोबत संगीतही ऐकायला मिळते. पण लिफ्टमध्ये आरसा असण्याचे कारण तुम्हाला माहित आहे का?

सुरूवातीला लिफ्टचा वेग खूप कमी होता. त्यामुळे लिफ्टमधील लोक कंटाळायचे. याविषयी लोक तक्रार करू लागले. यासाठी कंपनी पैसे खर्च करून वेगवेगळे उपाय करत असे.

यासर्व गोष्टींचा काहीच फायदा न झाल्याने लिफ्टचा वेग वाढवण्यापेक्षा लोकांचा कंटाळा कसा घालवता येईल यावर भर देण्यात आला.

त्यावेळी लोकांचा विचार करण्यात आला. तर असे समजले की, लिफ्टमध्ये लोकांकडे करण्यासारखे काहीच नसते. फक्त इकडे तिकडे पाहत वेगवेगळे विचार करणे हाच पर्यांय असायचा.

हा विचार करून लिफ्टमध्ये आरसे लावण्यात आले. जेणेकरून पुरूष त्यांचे केस नीट आहेत की नाही ते पाहू शकतील. महिला मेकअप कसा झाला आहे हे बघू शकतात.

VIEW ALL

Read Next Story