खमंग आणि चटपटीच थाण्याची इच्छा कैक कारणांनी होते.
शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचं प्रमाण कमी झाल्यास चटपटीत पदार्थांच्या सेवनाची इच्छा होते.
अशी इच्छा होणं म्हणजे शरीरात पोटॅशियम आणि सोडियमची कमतरता असणं होय.
जेव्हाजेव्हा शरीरातील पाण्याची पातळी खालावते तेव्हातेव्हा चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम पाणी प्यावं.
तणाव आणि पुरेशा झोपेचा अभाव असल्यासही चटपटीत खाण्याची इच्छा होते.
चटपटीत खाण्याची इच्छा झाल्यास भाजलेले चणे, शेंगदाणे अशा पदार्थांचं सेवन करावं.
अनेकदा चटपटीत खाणं ही आवड नसून, हा शरीराचा एक इशारा असतो. जिथं तुम्ही आहारात केळं, नारळपाणी अशा गोष्टींचा समावेश करावा.