लाल की पांढरा कोणता पेरू आरोग्यासाठी जास्त फायदेशीर?

Pooja Pawar
Oct 31,2025


सध्या पेरू या फळाचा सीजन असल्याने मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची आवक होत असते. तसं पाहायला गेलं तर आतून गुलाबी आणि पांढरे हे दोन्ही पेरू पौष्टीक आहेत.


पण आरोग्याला मिळणाऱ्या फायद्यांबाबत बोलायचं झालं तर दोघांमध्ये काहीसा फरक आहे.


लाल पेरूमध्ये लायकोपिनची मात्रा जास्त असते. लाल पेरू हा हृदय आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.


पांढऱ्या पेरूबद्दल बोलायचं झाल्यास यात व्हिटॅमिन सी आणि फायबरचं प्रमाण चांगलं असतं.


पांढरा पेरू हा रोगप्रतिकारशक्ती आणि पचनासाठी फायदेशीर ठरतो.


लाल आणि पांढरा या दोन्हीमध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.


तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल तर पांढरा पेरू खाऊ शकता.


हृदयरोग किंवा बीपीची समस्या टाळायची असेल तर लाल पेरू खाणं फायदेशीर ठरतं.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story