लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला वाटते की तिला सासरी चांगली सासू मिळावी. चांगली सासू होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. ते मिळवण्यासाठी अनेक गुण असावे लागतात.
एक चांगली सासू आपल्या सुनेच्या व्यक्तिगत निर्णयाचा आदर करत असते. ती तिला आपल्या मुलीप्रमाणे समजत असते.
जर सुनेला कोणतीही गोष्ट लवकर समजत नसेल तर सासूने तिला अधिक वेळ द्यावा.
सासूने तिच्या सुनेसोबत घरातील प्रत्येक कामामध्ये मदत केली पाहिजे.
प्रत्येक सासूने आपल्या सुनेची तुलना इतर कोणत्याही व्यक्तीशी केली नाही पाहिजे.
जर सून एखादे चांगले काम करत असेल तर सासूने तिचं सर्वांपुढे कौतुक केलं पाहिजे.