आजच्या काळात लग्नाला उशीर होणं किंवा लग्न न होणं या समस्येनं अनेकजण त्रस्त आहेत.

पण लग्नाला उशीर का होतो, एखादी व्यक्ती अविवाहित का राहते, हे कुंडलीत तयार होणाऱ्या ग्रहांच्या योगावर अवलंबून असतं.

अशा परिस्थितीत हा दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय दिले आहेत.

आज आम्ही तुम्हाला लवकर लग्न जमण्यासाठी काही उपाय सुचवणार आहोत.

दर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. त्यानंतर त्या पाण्याने अंघोळ करावी.

जर लग्नात विघ्न येत असतील तर घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला दररोज चमेलीचे तेल टाकून दिवा लावा.

जर तुमच्या कुंडलीत शुक्र दोष असेल आणि विवाहास अडचण येत असेल तर अंघोळीच्या गरम पाण्यात मोठी वेलची टाकून उकळा. या पाण्याने अंघोळ करा.

जर तुमच्या कुंडलीत गुरु कमजोर असेल तर केळीच्या झाडाला हळद टाकून पाणी अर्पण करावं.

VIEW ALL

Read Next Story