घरातील कोणतेही कार्य असो, महिलांना त्यांच्या नखांना सुंदर आणि आकर्षक बनवायचे असते.
त्यासाठी अनेक महिला नेल एक्सटेंशन्स करतात.
नेल एक्सटेंशन्स दिसायला खूप सुंदर असतात, पण त्यांना काढताना अडचणी येतात. तर जाणून घ्या नेल एक्सटेंशन्स सहजपणे कशी काढावी.
कापसावर अॅसिटोन घ्या आणि ते नखांवर लावून ठेवा. त्यावर अॅल्युमिनियम फॉईल 15-20 मिनिटे गुंडाळा, यामुळे नखे सहजपणे काढता येतात.
कोमट पाण्यात साबण मिसळून त्यात 15 मिनिटं नखे बुडवून ठेवा. त्यामुळे नखं मऊ होतात आणि सहजपणे निघून जातात.
बफर किंवा नेल फायलरने नेल एक्सटेंशन्स हलक्या हाताने घासून काढता येतात.
नखांच्या कडांवर ऑलिव्ह ऑईल किंवा व्हॅसलिन लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे नखं निघायला मदत होईल.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)