घराजवळ लावा फक्त 1 झाडं साप आसपास सुद्धा येणार नाही

पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्याने साप मानवी वस्तीत शिरतात. अनेकदा घरात साप शिरल्याने ते घरातील व्यक्तींना दंश करण्याची भीती असते.

तेव्हा केवळ पावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये सापांसारखे विषारी प्राणी घरात येऊ नये म्हणून एक झाड प्रभावी ठरतं. हे झाड तुम्ही घराच्या बागेत, दरवाज्याजवळ, गॅलरीत इत्यादी कुठेही लावू शकता.

सर्पगंधा :

सर्पगंधा हे असं झाड आहे ज्याच्या वासाने साप दूर पळतात. सर्पगंधा हे एक औषधी झाड असून ज्यात असणारे प्राकृतिक गुण सापांना दूर ठेवतात.

सर्पगंधा या झाडाचं साइंटिफिक नाव हे सवोल्फिया सर्पेतिना असं असून या झाडांचा वास सापांना सहन होत नाही.

सर्पगंधा झाडाचा वास खूप उग्र असल्याने साप हे झाड असलेल्या ठिकाणी भटकत नाही. सर्पगंधा या झाडाचे अनेक आयुर्वेदिक फायदे असून जीव जंतू चावल्यावर त्यावर इलाज म्हणून सुद्धा सर्पगंधाचा वापर केला जातो.

सर्पगंधाच्या झाडाची पान आणि साल विंचू आणि कोळीच्या विषाचा परिणाम कमी करण्यासाठी केला जातो.

जर तुम्हाला सर्पगंधाचे झाड मिळाले नाही तर त्याच्या ऐवजी तुम्ही लसूण, मगवॉर्ट, स्नेक प्लांट, तुळस, कांदा, सोसाइटी गार्लिक, लेमन ग्रास अशी रोप सुद्धा लावू शकता. यामुळे सुद्धा साप घराच्या जवळ येत नाहीत.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story