दही कांदा एकत्र खायला हवा की नको?
अनेकांना दही कांदा रायता खायला आवडतं.
दही आणि कांदा दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.
पण दही कांदा एकत्र खाणे आरोग्यासाठी चांगल की वाईट?
दही - कांदा एकत्र खाल्ल्याने तुम्हाला फायदा मिळतो.
कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि फायबर चांगलं असतं. तर दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात.
दोन्ही एकत्र खाल्ल्याने पोटाच्या समस्या कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
दह्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला निरोगी प्रथिने अधिक प्रमाणात देतात.
दह्याचा थंडपणा आणि कांद्याचा तिखटपणा एकत्र करुन रायता उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानला जातो.
कांदा त्याच्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराचे विषारी पदार्थांपासून संरक्षण आणि मजबूत करतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)