घरात देवी-देवतांचे फोटो असलेले कॅलेंडर ठेवावे की नाही?

Tejashree Gaikwad
Jun 08,2025


वास्तु आणि ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये देवतांच्या प्रतिमा असलेला कॅलेंडर लावणं शुभ मानलं जातं.


मात्र, त्यासाठी काही ठरावीक दिशा आणि नियम पाळणं आवश्यक असतं.


पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा मानली जाते आणि ती सकारात्मकतेचं, नव्या संधींचं प्रतीक आहे. या दिशेला देवतांच्या प्रतिमा असलेला कॅलेंडर लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.


उत्तर दिशा ही कुबेराची दिशा समजली जाते. म्हणूनच, या दिशेला कॅलेंडर लावल्यास घरात धन, समृद्धी आणि स्थिरता येण्यास मदत होते.


पश्चिम दिशा ही कामकाजाच्या प्रवाहाशी जोडलेली आहे. या दिशेला कॅलेंडर लावल्यास कामातील गती वाढते आणि निर्णयक्षमता सुधारते.


देवतांच्या प्रतिमा असलेले कॅलेंडर घरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करतात.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तुशास्त्रवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story