अंगात ताप असेल तर अंघोळ करावी की नाही? तज्ज्ञ काय सांगतात?

Published by: Zee Team | Feb 22, 2024

ताप, सर्दी, खोकला या आजारांची साथ

सध्या ताप, सर्दी, खोकला या आजारांची साथ पसरली आहे. लोक ताप आल्यानंतर स्वतःची काळजी घेतात, डॉक्टरांकडे जातात किंवा मेडिकल स्टोअर्स मध्ये जाऊन औषधे घेतात, या सर्व गोष्टी ते करतातच.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

तापात अंघोळ करणे चांगले की वाईट?

असे काही लोक असतात जे तापात अंघोळ करत नाहीत. पण तापात अंघोळ करणे चांगले की वाईट? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल. तर आता आपण याचबाबत जाणून घेणार आहोत.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

तापात अंघोळ करू नये

काही लोक अंघोळ करतात तर काही लोक अंघोळ करत नाही. तर तापात अंघोळ करू नये असं बहुतेक लोकांचं म्हणणं आहे. पण तापात अंघोळ कशी करावी किंवा आपली स्वतःची निगा कशी राखावी याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

कोमट पाणी

ताप आल्यानंतर कोमट पाणी करून त्यामध्ये कापड भिजवून शरीर स्वच्छ करावे.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

शरीराची स्वच्छता

आपल्या शरीराची स्वच्छता होते. मानसिक दृष्ट्या देखील आपल्याला बरे वाटते.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

गरम पाणी प्यावे

ताप आल्यानंतर गरम पाणी प्यावे. वाफ, आल्याचा चहा घेतल्यास आराम वाटतो.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्यावा

तसेच व्हायरल ताप आल्यानंतर प्रत्येकाने ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्यावा.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

VIEW ALL

Read Next Story