44 वर्षीय 2 मुलांची आई श्वेता तिवारीच्या चमकदार त्वचेचं रहस्य उघड

Neha Choudhary
Dec 26,2024


श्वेता तिवारी तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते.


वयाच्या 44 व्या वर्षीही श्वेताची त्वचा तरुण आणि चमकदार दिसते. तिचा या ग्लोइंग लूक चाहत्यांना आश्चर्यचकित करतो.


ग्लोइंग लूकसाठी श्वेता नैसर्गिक गोष्टींचा वापर करते.


ती ग्लोइंग लूकसाठी बेसन आणि हळद सारखे घरगुती फेस पॅक वापरते.


तिच्या चमकदार त्वचेचे रहस्य म्हणजे तिची हायड्रेशनची सवय. ती दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी पिते.


श्वेताने तिच्या आहारात ताजी फळं, हिरव्या भाज्या आणि नट्स खाते.


तिच्या त्वचेच्या आरोग्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तिचा फिटनेस रुटीन. योग, पायलेट्स आणि व्यायामावर ती भर देते.


त्यासोबत ती झोपेची पूर्ण काळजी घेते. ती 7-8 तासांची झोप घेते ज्यामुळे त्वचा ताजी ठेवण्यास मदत मिळते.


ती बाहेर जाण्यापूर्वी कायम सनस्क्रीन लावते. ज्यामुळे सूर्य किरणांपासून तिच्या त्वचेचा बचाव होतो.


श्वेता नियमितपणे क्लिन्जिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंगची काळजी घेते.

VIEW ALL

Read Next Story