अनेकांनाच सतत च्युइंग गम चघळण्याची सवय असते. पण एक प्रश्न अनेकांनाच पडतो की च्युइंग गम गिळल्यानं खरंच मृत्यू होतो?
जाणकारांच्या मते च्युइंग गम गिळल्यानं मृत्यू होण्याची शक्यता फार कमी असते.
च्युइंग गम खाल्ल्यानं पोट आणि आतड्यांच्या आरोग्यावर मात्र बराच परिणाम होतो. अतीसेवनामुळं आतडं आणि पोट सुजण्याचा धोता उदभवतो.
च्युइंग गम तयार करण्यासाठी प्रिझर्वेटीव्ह, फ्लेवरिंग आणि स्वीटनरचा वापर केला जातो.
च्युइंग गम गिळल्यानं पचनक्रिया प्रभावित होऊन त्यात अडथळे निर्माण होतात. ते पचण्यास जड जातं.
अनावधानानं तुम्ही च्युइंग गम गिळल्यास यामुळं न घाबरता गरज भासल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)