अनेकदा लोक त्यांचे काम लवकर आणि सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधत असतात.
आज आपण अशा काही स्वयंपाकघरातील टिप्स पाहूयात. ज्या तुमचे दैनंदिन जीवन खूपच सोपे करतील.
कांदा कापण्यापूर्वी काही वेळ थंड पाण्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवावा. असे केल्यास कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत नाही.
अंडी उकडल्यानंतर ती थंड पाण्यात 5 मिनिटे ठेवावी. यामुळे अंड्याचे कवच सहज निघते.
पनीर तळण्यापूर्वी त्याला अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. असे केल्यास पनीर तळताना जळत नाही.
भाज्या लवकर शिजवायच्या असतील, तर त्या आधी 5 मिनिटे पाण्यात उकळून घ्या. असे केल्याने भाज्या पटकन शिजतात.
जर एखाद्या भाजीमध्ये मीठ जास्त झाले असेल. तर त्यात थोडासा लिंबाचा रस घाला. यामुळे भाजीतला खारटपणा कमी होतो.