संपूर्ण देशभरात उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे.
कडक सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यामुळे अनेकांना तापमानाचा त्रास होऊ लागतो.
मात्र, काही साध्या उपायांनी तुम्ही घरात थंडावा राखू शकता ज्यामुळे AC किंवा कुलरचीही गरज भासणार नाही.
1. संध्याकाळी छतावर पाणी घालल्याने रात्री पंख्याच्या वाऱ्यासोबत थंड हवा निर्माण होईल.
2. घराच्या बालकनीत गवत किंवा रोपे लावल्याने तुम्ही घरामध्ये नैसर्गिक थंडावा आणू शकता. झाडे आणि रोपे वातावरण शुद्ध करतात आणि घरात थंडावा निर्माण करतात.
3. घरातील रुम नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, कारण धूळ आणि घाण वातावरण अधिक उष्ण करते.
4. टेबल फॅन समोर एका वाटीत बर्फ ठेवल्याने, फॅनची हवा थंड होईल आणि तुम्हाला थंड हवा मिळेल.
या टिप्स वापरून तुम्ही उन्हाळ्यात सहजपणे घरात थंडावा राखू शकता आणि AC किंवा कुलरची आवश्यकता टाळू शकता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)