ग्रेव्हीची भाजी बनवताना कधी कधी त्यात मसाला कमी पडतो आणि पाणी जास्त झाल्याने खूपच पातळ होते. अशावेळी भाजीची चवही बिघडते.
पण भाजीत पाणी जास्त झाल्यास तुम्ही तांदळाच्या पीठाच्या पाण्याचा वापर करुन पुन्हा पुर्वरत करु शकता
सर्वात पहिले एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप टाकून त्यात दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ टाका आणि चांगले भाजून घ्या
पीठाला चांगलं भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करुन घ्या.
त्यानंतर अर्धा कप पाणी कोमट करुन घ्या व नंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून चांगलं मिक्स करुन घ्या
आता ही पेस्ट तुमच्या ग्रेव्हीमध्ये मिसळण्यासाठी. मंद आचेवर ग्रेव्ही ठेवून थोडी थोडी ही पेस्ट त्यात टाका आणि 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्या
या पेस्टमुळं भाजी दाटसर तर होईलच पण भाजीचा रंग आणि चवही बदलणार नाही.