स्मोकिंग बॅन असलं तरी फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये का असतात अ‍ॅशट्रे

Diksha Patil
Jun 19,2025


विमानानं प्रवास करायचा असेल तर तुम्हाला अनेक नियमांचं पालन करावं लागतं. ज्यांचं पालन करणं गरजेचं आहे.


ज्या लोकांनी कधी विमानानं प्रवास केलेला नाही त्यांना देखील माहित आहे की विमानात स्मोकिंग अर्थात धुम्रपान करण्यास बंदी आहे.


पण तुम्हाला माहित आहे का की विमानात स्मोकिंग बॅन असलं तरी टॉयलेटमध्ये अ‍ॅशट्रे का ठेवण्यात येतो?


2000 मध्ये एअरलाइन्सनं स्मोकिंगवर बंदी लगावली होती. ज्यामुळे विमानात धुम्रपान करण्यावर बंदी आहे आणि असं केल्यास कारवाई करण्यात येते.


दरम्यान, तरी सुद्धा सुरक्षतेचा विचार करता टॉयलेटमध्ये अ‍ॅशट्रे ठेवण्यात येतो.


कारण जर कोणी चुकून स्मोक केलं तर त्यानं ते अ‍ॅशट्रे मध्ये ठेवावं विमानात कुठे फेकू नये.


विमानात जर इतर ठिकाणी किंवा कचऱ्याच्या डब्ब्यात जर सिगरेट फेकली तर विमानाला आग लागू शकते. त्यामुळे अ‍ॅशट्रे ठेवण्यात येतो. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story