'या' झाडांजवळ आकर्षित होतात साप, घरी लावण्यापूर्वी विचार करा

Pooja Pawar
Dec 23,2024


साप हा जगातील सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे. त्यांच्या दंशामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो.


आज तुम्हाला अशा झाडांविषयी सांगणार आहोत ज्या झाडांजवळ साप आकर्षित होतात.


साइप्रसचे झाड जे दिसायला सुंदर आणि दाट असल्याने अनेकजण घरात सजावटीसाठी हे झाड लावतात. पण हे झाड दाट असल्यामुळे सापांना ही झाड आवडतात, कारण ते सहज यात लपू शकतात.


अनेकजण घराजवळ लिंबाचं झाड देखील लावतात, पण घनदाट झाडामुळे उंदीर, साप आणि अन्य किडे या झाडाजवळ आकर्षित होतात.


चमेलीच फुल अनेकांना आवडत म्हणून ते घरातील छोट्या कुंडीमध्ये किंवा घराजवळील आवारात लावलं जातं. परंतु हे झाड घनदाट असत ज्यामुळे साप, विंचू सारखे जीव याच्यात लपतात.


लवंगाचा सुगंध इतका तीव्र असतो की त्यामुळे साप आकर्षित होतात. त्यामुळे घराजवळ किंवा कुंडीमध्ये हे झाड लावू नये.


चंदनाच्या सुगंधाने साप चंदनाच्या झाडाकडे आकर्षित होतात. चंदनाचं झाड हे खूप लांब आणि सावली देणार असतं. ज्यामुळे साप झाडाजवळ राहतात आणि आपला निवारा बनवतात.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story