पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या कमांडोना किती पगार मिळतो? आकडा ऐकून धक्का बसेल

Pooja Pawar
Apr 15,2025


एसपीजी म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप हे देशातील सर्वात खास सुरक्षा फोर्स मानली जाते.


एसपीजी कमांडोवर पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. हे कमांडो खूप मजबूत, प्रशिक्षित आणि विश्वसनीय असतात.


तेव्हा एसपीजी कमांडो कसे बनता येते त्यांना किती पगार असतो त्याचे प्रशिक्षण कसे घेतले जाते याविषयी जाणून घेऊयात.


1985 मध्ये एसपीजी कमांडो फोर्सची तुकडी तयार करण्यास सुरुवात झाली होती. यांना खास करून पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वापरले जाते.


यांचा दरमहा पगार हा 84,000 ते 2,40,000 इतका असतो. यासह त्यांना विविध भत्ते आणि सुविधा सुद्धा मिळतात.


कमांडो जेव्हा ऑपरेशनल ड्यूटीवर असतो तेव्हा त्याला प्रत्येकवर्षी जवळपास 27,000 रुपये ड्रेस भत्ता मिळतो. तर नॉन-ऑपरेशनल ड्यूटी कमांडोना वर्षाला 22,000 रुपये भत्ता मिळतो.


एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) मध्ये थेट भरती केली जात नाही. त्यामध्ये फक्त तेच सैनिक समाविष्ट होतात जे आधीच आयपीएस, सीआयएसएफ, बीएसएफ किंवा सीआरपीएफ सारख्या कोणत्याही विशिष्ट सुरक्षा दलात कार्यरत असतात.


एसपीजी कमांडोची निवड त्यांची निवड सेवा रेकॉर्ड, तंदुरुस्ती आणि अनुभवाच्या आधारे केली जाते. दरवर्षी ही टीम बदलत राहते.

VIEW ALL

Read Next Story