प्लास्टिक, काच की स्टील उन्हाळ्यात कोणत्या बॉटलमधून पाणी प्यावं?

Pooja Pawar
Apr 30,2025


पाणी पिण्यासाठी अनेकजण प्लास्टिक, काच की स्टील या बॉटलचा वापर करतात. या बॉटलमध्ये पाणी स्टोअर करून गरजेनुसार त्याचे सेवन केले जाते


परंतु कोणत्या बॉटलमधील पाणी पिणं हे आरोग्यासाठी सुरक्षित ठरतं याविषयी जाणून घेऊयात.


स्टेनलेस स्टीलच्या बॉटल: स्टेनलेस स्टीलच्या बॉटलमध्ये पाणी जास्त काळ गरम किंवा थंड राहू शकतं. तसेच उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊनही स्टेनलेस स्टीलच्या बॉटलमधील पाण्यात कोणतीही रासायनिक क्रिया होत नाही. तसेच या बॉटल बुरशी आणि बॅक्टेरिया पासून सुरक्षित असतात.


काही स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या या हलक्या दर्जाच्या असतात त्यामुळे त्यांना गंज लागण्याची भीती असते. तेव्हा चांगल्या दर्जाच्या स्टेनलेस स्टील बॉटल वापराव्यात.


काचेच्या बॉटल या पारदर्शक असल्याने अधिक सुरक्षित असतात तसेच त्याच्यातील पाण्यावर कोणत्याही प्रकारच्या रसायनांची अभिक्रिया होत नाही. तसेच यात पाणी फक्त काहीकाळ थंड किंवा गरम राहू शकते.


परंतु काचेच्या बॉटल या तुलनेनं जड असतात. तसेच काचेच्या बाटल्या फुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्या वापरताना जास्त काळजी घ्यावी लागते.


प्लास्टिकच्या बॉटल या पर्यावरणासाठी हानिकारक असण्यासोबतच त्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक असतात. प्लास्टिक पाण्यामध्ये हानिकारक रसायनं सोडून आपल्या शरीराला हानी पोहोचवतं. जास्तकाळ गरम किंवा थंड पाणी प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवू नये.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story