बहुतेक घरांमध्ये बाथरूम किंवा बाथरूमजवळ आरसा लावलेला असतो.
आरशावर अनेक वेळा पाण्याचे किंवा साबणाचे डाग राहतात.
अनेक वेळा साफसफाई केल्यानंतरही आरशावरील पाण्याचे डाग जात नाहीत.
जर तुमचे आरसे स्वच्छ होत नसतील, या टिप्सच्या मदतीने तुम्ही आरसे स्वच्छ करु शकता.
व्हिनेगरमध्ये नैसर्गिक क्लिनिंग एजंट असतात. तुम्ही स्प्रे बाटलीमध्ये पाणी आणि व्हिनेगर मिसळून आरसा स्वच्छ करू शकता.
बेकिंग सोड्यात सौम्य स्क्रबिंग एजंट असतात, जे आरसा स्वच्छ करण्यास खूप मदत करतात.
थोड्या पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवावी आणि ही पेस्ट आरशावर लावून स्वच्छ करा.
तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून आरशावरचे डाग काढू शकता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)