शुगरची समस्या ही इतकी भयानक असते की त्या काळात जेवणावर नियंत्रण ठेवावं लागतं.
लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी मेशी, मूग डाळ, गूळ, ड्रायफ्रुट्स, वेचली पावडर आणि केसर महत्ताचे आहेत.
रात्री मेथी आणि मूड डाळ वेगवेगळी भिजत घाला. सकाळी त्यातील पाणी काठून त्यांना वेगवेगळं दळून घ्या.
पॅनमध्ये गावठी तूप गरम करा आणि त्यात मेथी आणि मूगाच्या डाळीची पेस्ट घालून त्याला चांगलं भाजून घ्या. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात काढून घ्या आणि त्यात गुळाचं पाणी घाला आणि चांगलं मिक्स करा.
ड्रायफ्रुट्स चांगल्या पद्धतीनं मिक्सर करा. त्यासोबत वेलची पावडर आणि केसर देखील घाला आणि लाडू बनवा.
या लाडूचे सेवन केल्यानं ब्लड शुगर हे मेन्टेन राहतं पण कोणताही पदार्थ हा तुमच्या डायटमध्ये सहभागी करण्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)