घरच्या घरी बनवा ताकाचा मसाला, पाचक आणि चवीलाही भारी!

Mansi kshirsagar
Mar 07,2025


उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी लोक दही, ताक यासारखे पदार्थ सेवन करतात.


अनेकांना मसाला ताकदेखील आवडते. त्यामुळं बाहेरून ताक विकत आणले जाते.


पण तुम्हाला माहितीये घरीदेखील तुम्ही मसाले ताक बनवू शकता. त्यासाठी लागणाऱ्या या टिप्स फॉलो करा.

साहित्य

दही, भाजलेले जीरं, काळं मीठ, लाल तिखट, कोथिंबीर, पुदीना, हिरवी मिरची, आले, लसूण, साखर

कृती

सगळ्यात पहिले दही घेऊन त्यात थोडे पाणी घालून ताक करुन घ्यावे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, जिरे, हिरवी मिरची, चिमूटभर साखर, धणे, आले,लसूण, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालावे


त्यानंतर हे सर्व मिश्रण बारीक करुन घ्यावे. या मिश्रणाची पेस्ट करुन एका भांड्यात काढून घ्यावी.


आता तयार केलेल्या ताकात ही पेस्ट टाकून ताक चांगले घुसळून घ्यावे. आता दुपारी किंवा सकाळी तुम्ही या ताकाचे सेवन करु शकता

VIEW ALL

Read Next Story