बहुतेक सर्वांच्याच घराच रविवारी डोसा आणि चटणी असा स्पेशल बेत असतो.
पण त्याच साध्या डोशाला युनिक पद्धतीने बनवून रविवारचा नाश्ता आणखी मजेदार आणि हेल्दी बनवता येईल.
यासाठी सर्वप्रथम साध्या डोशाच्या बेटरमध्ये बीटरूट प्युरी घालून चांगले एकत्र करा.
तुम्ही हवे असल्यास त्यात बारीक किसलेला बीटरूट देखील घालू शकता.
आता एका भांड्यात पनीर कुस्करून घ्या.
त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, काळी मिरी घाला.
नंतर चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घालून एकत्र करा. मिश्रण तयार करा.
आता एका नॉन-स्टिक पॅनवर साध्या डोशाप्रमाणे बीटरूट डोसा बनवा.
एका बाजूने डोसा वाफल्यानंतर त्यावर पनीरचे मिश्रण पसरवा.
पुन्हा एकदा तव्यावर झाकण ठेवून वाफू द्या.
तयार झालेला गरमा गरम बीटरूट पनीर डोसा सांबर आणि चटणीसह सर्व्ह करा.