सुपरफिट माधुरी दीक्षितची हेल्दी स्मूदी रेसिपी; कोणत्याही वयात ठेवा आरोग्य जबरदस्त!

Published by: Intern | Jun 12, 2025

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित ही जगातील सर्वात सुंदर आणि प्रतिभाशाली अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

Published by: Intern | Jun 12, 2025

जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ तिने भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे.

Published by: Intern | Jun 12, 2025

तिच्या अभिनय कौशल्याने आणि मोहक नृत्यशैलीने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताज्या आहेत.

Published by: Intern | Jun 12, 2025

2023 मध्ये माधुरीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिची आवडती हेल्दी स्मूदी रेसिपी शेअर करत धावपळीच्या जीवनशैलीतही आरोग्य कसे जपावे, हे सांगितले.

Published by: Intern | Jun 12, 2025

माधुरी दीक्षितने हे सांगितले होते की, ही स्मूदी तुम्ही व्यस्त दिवसात, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण किंवा झोपण्यापुर्वी कधीही घेऊ शकता.'

Published by: Intern | Jun 12, 2025

साहित्य:

2 कप थंड बेरीज (स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, रास्पबेरी), अर्धा कप बदामाचे किंवा ओट्स दूध, 1 स्कूप प्रोटीन पावडर, अ‍ॅव्होकाडो, सुका मेवा

Published by: Intern | Jun 12, 2025

कृती

मिक्सरमध्ये सर्व थंड बेरीज घाला. त्यात अर्धा कप बदामाचे किंवा ओट्सचे दूध मिसळा. त्यावर 1 स्कूप प्रोटीन पावडर टाका आणि चांगले ब्लेंड करा.

Published by: Intern | Jun 12, 2025

अधिक पौष्टिकता हवी असल्यास त्यात अ‍ॅव्होकाडो किंवा आवडते ड्राय फ्रूट्सही घालू शकता.

Published by: Intern | Jun 12, 2025

ही हेल्दी स्मूदी कोणत्याही वयोगटातील व्यक्तींसाठी योग्य आहे आणि दिवसभर शरीरात उर्जाही ठेवते.

Published by: Intern | Jun 12, 2025

VIEW ALL

Read Next Story