बहुतेक लोकं कांदे साठवण्यासाठी फ्रिजचा वापर करतात, तर काही लोकं कांदे स्वयंपाकघरात साठवतात.
पण पावसाळ्यात कांदे कुजू नयेत म्हणून ते नक्की कसे साठवावे याबद्दल लोकांना कळत नाही.
पावसाळ्यात कांदे कुजण्यापासून वाचवण्यासाठी पुढील उपाय खूप जास्त फायदेशीर ठरतात.या उपायांमुळे कांद्यांची साठवण उत्तमप्रकारे करता येते.
पावसाळ्यात कांदे कुजू नयेत म्हणून ते ठेवण्यासाठी बांबूपासून बनवलेल्या टोपल्यांचा वापर करा.
हवा खेळती राहिल अशा जाळीदार पिशव्यांचा वापर कांदे साठवण्यासाठी करा.
कांदे कुजण्यापासून वाचवायचे असल्याल ते थंड, कोरड्या आणि काळोख असणाऱ्या ठिकाणी ठेवा.
पावसाळ्यात प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कांदे ठेवणे टाळा.
हे सर्व उपाय केल्याने पावसाळ्यात कांदे कुजत नाहीत आणि कांदे उत्तमप्रकारे साठवता येतात.