अनेकजणांच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊन होते. चहा आपल्या जीवनशैलीचाच एक भाग बनला आहे.
चहा चांगला असेल तर दिवस चांगला जातो, असे चहाप्रेमींना वाटतं.
असं असलं तरी अनेकांना चहा कशी चांगली बनवायची हेच माहिती नसतं.
चहा बनवताना दूध आधी टाकायचं की पाणी आधी टाकायचं हे अनेकांना माहिती नसतं.
चहा बनवताना तुम्ही आधी दूध टाकलात तर त्याचा वीवर परिणाम होऊ शकतो, असे एक्सपर्ट सांगतात.
चांगला चहा बनताना दूध आणि पाणी चांगले एकत्र होणे आवश्यक असते.
परफेक्ट चहा बनवण्यासाठी टोपात पाणी घ्या. टोप स्टोवर ठेवून पाणी चांगले उखळा.
दूध टाकल्यानंतरही दुधातला कच्चेपणा राहू नये यासाठी हे महत्वाचे असते.
पाणी उखळल्याच्या नंतर दूध टाका. ज्याच्या एक मिनिटानंतर चहापत्ती टाका.
यामुळे चहामध्ये कच्चेपणा राहणार नाही. दूध फाटण्याची शक्यता कमी होते.
यानंतर चहापत्तीचा फ्लेवर पूर्णपणे येण्यासाठी 6 मिनिटांचा वेळ लागेल. यानंतर तुमचा परफेक्ट चहा पिण्यासाठी तयार असेल.