अनेकांना सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी थकवा दूर करण्यासाठी चहा किंवा कॉफीची गरज असते.
चहा आणि कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. जे आपल्या हृदय आणि मेंदूला आधार तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
परंतु, अनेकांना प्रश्न पडतो की सकाळी कॉफी पिणे की चहा पिणे चांगले.
चहामध्ये पॉलीफेनॉल नावाचे संयुगे असतात. जे अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. जे शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात.
चहामध्ये अमिनो अॅसिड असतात. जे मूड सुधारण्यास आणि विचार क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात.
कॉफीमध्ये भरपूर कॅफिन असल्याने तुमची चिडचिड होऊ शकते. त्याचबरोबर डोकेदुखीसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. तर चहामध्ये कमी कॅफिन असते.
यामुळे चहा किंवा कॉफी यामध्ये तुमच्या शरीराला कॅफिन सहन करण्याची किती क्षमता तसेच तुमचे आरोग्य आणि तुमच्या गरजांवर अवलंबून असते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)