प्रत्येक पालकांना आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार व गुण असावे असं वाटतं.
म्हणूनच प्रत्येक पालक आपल्या मुलाला चांगली शिकवण देतो. यामुळेच मुले ते शिकतात जे त्यांना शिकवले जाते.
आम्ही तुम्हाला अशा काही पालकत्वाच्या टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मुलांचे सर्वत्र कौतुक होईल.
1. तुम्ही कोणाशी बोलत असताना मुलांनी मध्ये-मध्ये बोलू नये, अशी सवय लावली पाहिजे.
2. मुलांना सर्वांशी शांततेने आणि सभ्यतेने बोलायला शिकवा. ओरडून किंवा चिडून बोलण्यास अडवावे.
3. तुमच्या मुलाला कोणाच्याही परवानगीशिवाय काहीही न करण्याची सवय असली पाहिजे.
4. मुलांना गोष्टी शेअर करण्याची सवय लावा. त्यांना समजावून सांगा की 'शेअरिंग इज केअरिंग'.
5. मुलांमध्ये स्वतःची छोटी कामे स्वतः करण्याची सवय लावा. यामुळे ते स्वावलंबी होतील.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)