शिकवणं हीदेखील एक कलाच आहे आणि शिक्षकांनी ती बरोबर येते. शिक्षकांनी सांगितलेले मुलं बरोबर ऐकतात.
त्यामुळं पालकांनीही शिक्षकांच्या या काही ट्रिक्स माहिती असायलाच हवं
मुलांची वाढ असताना त्यांचं केलेले कौतुक हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मुलांनी शाळेत केलेल्या कामाचं शिक्षकांकडून कौतुक केलं जातं. त्याचप्रमाणे पालकांनीही मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक केलं पाहिजे.
शाळेच्या वर्गातील मुलांचे रुटिन सेट झालेले असते आणि ते मुलांचा आवडतेदेखील त्याचप्रमाणे पालकांनीही मुलांचा अभ्यास आणि बेडटाईम रुटिन घरीदेखील काटेकोरपणे पाळावे. त्यामुळं मुलांनाही शिस्त लागेल.
शिक्षक सातत्याने मुलांना अॅक्टिव्हिटी देत असतात त्यामुळं मुलं त्यातच गुंतून राहतात. पालकही याचप्रमाणे मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी काही अभ्यासाविषयी गेम किंवा मैदानी खेळ त्यांना शिकवू शकतात.
मुलांची प्रगती व्हावी यासाठी शिक्षक त्यांच्यासाठी एक ध्येय ठरवतात. त्याचप्रमाणे पालकांनीही तसे ध्येय ठरवावे आणि त्यासाठी अॅक्शन प्लानदेखील तयार ठेवावा.
शिक्षक मुलांना स्वतःहून निर्णय घेण्याची मुभा देतात त्यामुळं मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतात. पालकांनीही शिक्षणाबाबतीत मुलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे.
मुलांना छोट्या छोट्या गोष्टींचं कुतूहल असते. शिक्षक त्यांना प्रश्न विचारु देतात तसं त्याच्या प्रश्नाची उत्तर देण्याचाही प्रयत्न करतात. पालकांनीही मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रय़त्न करावा. त्यामुळं ते मोकळेपणाने प्रश्न विचारु शकतात