नेव्ही ब्ल्यू पँट आणि पांढरा शर्ट, फॉर्मल लूकसाठी हा एक परफेक्ट कलर कॉम्बो आहे.
आकाशी निळ्या रंगाचा शर्ट आणि गडद राखाडी रंगाची पँट, हे कॉम्बिनेशन तुम्हाला एक सीरियस लूक मिळवून देतो.
बेज किंवा क्रीम रंगाचा शर्ट आणि काळी पँट, हे कॉम्बिनेशन दिसायला खूपच रिच आणि रॉयल दिसते.
सौम्य ऑलिव्ह ग्रीन किंवा पिस्ता रंगाचा शर्ट आणि काळी किंवा गडद निळी पँट, हे कॉम्बिनेशन भारतीय स्किन टोनला अधिक खुलवते.
पांढरा शर्ट आणि डार्क ब्राऊन रंगाची पँटमुळे तुमच्या लूकला एक सॉफ्ट पण प्रोफेशनल इमेज मिळते.
फॉर्मल कपडे परिधान करताना, तुमचा बेल्ट आणि शूज एकाच रंगाचे असायला हवेत.
योग्य फिटिंगसाठी नेहमी स्लिमफिट किंवा टेलर मेड कपड्यांना प्राधान्य द्या.
याचसोबत एक साधे लेदर स्ट्रॅपचे घड्याळ तुमचे लूक पूर्ण करण्यास मदत करेल.