या 5 पदार्थांमध्ये असते दुधापेक्षा जास्त कॅल्शियम

Intern
Jun 28,2025

बदाम

100 ग्राम बदामात 264 मिलीग्राम कॅल्शियम असते जे दुधापेक्षा अधिक आहे. बदामात व्हिटॅमिन E,मॅग्नेशियम सोबतच अजून काही पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

चिया सीड्स

चिया सीड्स मध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. फक्त दोन चमचे चिया सीड्स मध्ये 179 मिलीग्राम कॅल्शियम असते जे दुधापेक्षा अधिक आहे.

सफेद तीळ

एक चमचा सफेद तीळामध्ये 88 मिलीग्राम कॅल्शियम असते. तसेच तीळामध्ये कॅल्शियम बरोबरच कॉपर, मॅग्नेशियम आणि आयर्न सुद्धा असते.

अंजीर

एका अंजिरामध्ये 241 मिलीग्राम कॅल्शियम असते जे दुधापेक्षा सुद्धा जास्त आहे. तसेच अंजिरामध्ये आणखी काही वेगवेगळ्या प्रकारचे एंटीऑक्सीडेंट्स असतात जे आपल्याला अनेक आजारांपासून लांब ठेवतात.

सुरमई मासा

सुरमई मासा हा कॅल्शियम चा सगळ्यात मोठा स्रोत आहे. 84 ग्राम सुरमईत 325 मिलीग्राम कॅल्शियम असते. या माशामध्ये जेवढे कॅल्शियम असते तेवढे कुठेच आढळत नाही.

कॉलर्ड ग्रीन्स

कॉलर्ड ग्रीन्स ही एक पालेभाजी आहे, ज्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असते. कॉलार्ड ग्रिन मध्ये 266 मिलीग्राम कॅल्शियम असते.

पांढरे वाटाणे

एक कप पांढऱ्या वाटाण्यांमध्ये 161 मिलीग्राम कॅल्शियम असते. यामध्ये कॅल्शियम बरोबरच प्रोटीन ,फायबर आणि आयर्न सुद्धा मोठ्या प्रमाणात असते.

Disclaimer

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story