तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक मानलं जातं.
पण प्रत्येकासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं लाभदायक नसतं. काही लोकांना कॉपरच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
तेव्हा काही लोकांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
किडनीच्या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण शरीरात तांब जमा झाल्याने किडनीची कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते.
विल्सन रोग हा एक अनुवांशिक विकार आहे ज्यामध्ये शरीरात तांब्याचे नियमन योग्य नसते आणि यकृत, मेंदू आणि इतर अवयवांमध्ये तांबे जमा होऊ लागते.
ज्या लोकांना तांब्याची ऍलर्जी आहे अशा लोकांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं टाळलं पाहिजे. यामुळे खाज, रॅशेज, स्किन इरिटेशन, पचनक्रियेशी निगडित त्रास होऊ शकतात.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी जास्त प्रमाणात तांब्याच्या भांड्यातून पाण्याचे सेवन करणे टाळावे कारण तांब्याचे उच्च प्रमाण आई आणि बाळासाठी हानिकारक असू शकते.
जास्त प्रमाणात तांब्याचे सेवन केल्याने मुलांमध्ये कॉपर टॉक्सिसिटी होऊ शकते, ज्यामुळे उलट्या, पोटदुखी, मळमळ आणि गंभीर प्रकरणांमध्ये लिव्हर डॅमेज होऊ शकतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)