पाले- भाज्या तसेच फळभाज्या आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात.
परंतू काही भाज्या अशा असतात ज्या उकळल्यानंतर अधिक पौष्टिक बनतात.
गाजर उकळवल्याने ते अधिक गुणकारी बनते आणि गाजरामध्ये असलेले पोषक घटक पचनास मदत करतात.
जेव्हा आपण ब्रोकोली उकळतो तेव्हा त्यामध्ये मायरोसिनेज एंझाइम हे प्रोटीन तयार होते आणि त्यामुळे ब्रोकोली अत्यंत पौष्टिक बनते.
टोमॅटो उकळवल्याने त्यामधील 'लायकोपीन'चे प्रमाण वाढते. ज्यामुळे ते आपल्या शरीरासाठी अधिक गुणकारी बनतात.
बीट उकळल्यानंतर त्यात फॉलेट ऍसिडचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपल्या शरीरातील पचनव्यवस्था सुधारण्यास मदत होते.
बटाटे उकळल्याने त्यात व्हिटॅमिन C चे प्रमाण वाढते आणि त्यामुळे बटाटे अधिक पौष्टिक बनतात.
(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)