मसाला चहा हा एक भारतीय पद्धतीचा चहा आहे, जो दूध आणि लवंग, दालचिनीसारख्या मसाल्यांपासून बनवला जातो, हा चहा मुसळधार पावसामध्ये पिण्यासाठी खूप उत्तम ठरतो.
हॉट चॉकलेट हे पेय तुमच्या शरीरासाठी उत्तम ठरेल आणि त्यासोबतच हॉट चॉकलेटच्या अनोख्या चवीमुळे तुमचे मनसुद्धा आनंदी होईल.
फिल्टर कॉफी ही खूप कमाल आणि सुगंधित असते, ही फिल्टर कॉफी पावसाळ्याच्या दिवसांत सर्वात जास्त पसंत केली जाते.
आल्याचा चहा हा उबदारपणा आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, तसेच आल्याच्या चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
हे पेय दूधामध्ये हळद घालून बनवले जाते. खोकला असल्यास किंवा घशाला आराम देम्यासाठी हळदीचे दूध पिणे लाभदायी ठरते.
लिंबू, मध पाणी हे पेय तुम्हाला स्फूर्ती देऊन जाते आणि पावसाळ्यात सर्दीला,खोकल्यापासून दूर ठेवण्यास मदत करते.
कहावा ही एक काश्मिरी चहा किंवा तत्सम पेय आहे. ज्यामध्ये केशर, दालचिनी आणि बदाम वापरुन ही चहा बनवली जाते.[ छायाचित्र सौजन्य सोशल मिडीया वरून घेण्यात आले आहे.]
(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)