सध्याच्या काळात शरीरात आयर्नची कमतरता ही एक कॉमन समस्या बनली आहे. आयर्नच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
आयर्न हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक खनिज आहे आणि ते हिमोग्लोबिन तयार करण्यास आणि पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते.
पालक : पालकच्या भाजीत आयर्नचं प्रमाण चांगलं असतं. १०० ग्रॅम पालकामध्ये सुमारे २.७ मिलीग्राम आयर्न असते.
गूळ : गूळमध्ये चांगल्या प्रमाणात आयर्न असतं. विशेषतः हिवाळ्यात, गुळाचे सेवन हे केवळ गोड नसतं तर अशक्तपणा देखील दूर होतो.
डाळिंब : डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्ताचे प्रमाण वाढवण्यास आणि ते शुद्ध करण्यास मदत करतात.
बीट : बीटमध्ये आयर्न सोबतच फोलिक एसिड आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. हे रक्ताभिसरण सुधारते आणि लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढविण्यास मदत करते.
तीळ : एक चमचा तीळात भरपूर आयर्न, कॅल्शियम आणि जस्त असते. तीळ लाडू, चटणी, तीळ गूळ चिक्की किंवा पराठ्यांमध्ये घालून तुम्ही याचं सेवन करू शकता.
मनुके : दररोज मूठभर मनुके खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात आयर्न मिळते, जे रक्त निर्मितीस मदत करते आणि अशक्तपणा दूर करते.
सोयाबीन : सोयाबीनमध्ये केवळ प्रथिनेच नाहीत तर आयर्न देखील भरपूर असते.
हिरवी मूग डाळ : हिरवी मूग डाळ पचायला सोपी असतेच, पण त्यात भरपूर आयरन, प्रथिने आणि फायबर देखील असते. ते शरीराला ऊर्जा देते आणि रक्ताचे प्रमाण वाढवते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)