भारत जैवविविधता असलेला जगभरातील आठवा देश आहे. देशात अनेक प्रकारचे प्राणी-पक्षी आढळतात.

Mansi kshirsagar
Feb 02,2024


प्राण्यांच्या काही प्रजाती अशा आहेत ज्या फक्त भारतातच आढळतात. भारतात सध्या 566 अभयारण्य आणि 104 नॅशनल पार्क आहेत.


काही प्राणी असे आहेत जे फक्त भारतातच आढळतात. कोणते आहेत हे प्राणी जाणून घेऊया.


संगाई हरिण हा मणिपूरचा राज्य प्राणी असून त्याचे इंग्रजी नाव Manipur brow-antlered deer असं आहे.


निलगिरी ताहर हा तामिळनाडूचा राज्यप्राणी असून तो फक्त पश्चिम घाटातच आढळतो


लायन टेल मकाक ही माकडाची प्रजाती असून दक्षिण भारतात आढळते.


काश्मीर स्टॅग/हंगुल ही लाल हरणाची प्रजाती काश्मीरच्या खोऱ्यात व हिमाचल प्रदेशात आढळते.


एक शिंगी गेंडा हा भारतातच आढळतो. आसाममधील काझीरंगा अभयारण यासाठी प्रसिद्ध आहे.

VIEW ALL

Read Next Story